*कोकण Express*
*आयजि च्या जीवावर बायजी उदार अशीच तालुक्यातील काही नेत्यांची पद्धत झालेली आहे…*
*जिल्हाध्यक्ष संजना सावंत यांच्यामुळेच सांगवे दिर्बादेवी, कणकवली ते नाटळ, कणकवली ते शिवडाव बस सेवा सुरू; संजय सावंत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कणकवली ते सांगवे दिर्बादेवी, कणकवली ते नाटळ, कणकवली ते शिवडाव या तीन फेऱ्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार दिवसातून दोन वेळेस यापूर्वी चालू असलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवणे बाबत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांनी दिनांक २1 सप्टेंबर २०२१ च्या पत्रान्वये विभाग नियंत्रक कणकवली यांचे लक्ष वेधले होते. याबाबतची एसटी विभागाकडून घेतलेली रीतसर पोच देखील उपलब्ध आहे. तसेच सदर एसटी सेवा तातडीने सुरू होण्याविषयी दूरध्वनीवरून विभाग नियंत्रक एसटी परिवहन महामंडळ यांच्याशी चर्चा करून एसटी सेवा सुरू करून घेतलेली आहे. परंतु तालुक्यातील एका नेत्याकडून २२ सप्टेंबर २०२१ चे पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ यांना आपण दिल्याचे भासवून श्रेयवाद सुरू केलेला आहे. एक प्रकारे *आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार*. ह्या म्हणीप्रमाणे अध्यक्ष यांनी केलेल्या कामाचे एकाचे श्रेय स्वतः घेऊन सुभेदार बनण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सांगवे, नाटळ, शिवडाव या ग्रामीण भागातील जनता सुज्ञ असून त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे अशा सुभेदाराने फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा नाव न घेता टोला संजय सावंत यांनी लगावला.