*कोकण Express*
*सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीसाठी मार्चपूर्वी निधी देऊ…*
*अब्दुल सत्तारांची ग्वाही; आवश्यक असलेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी निधी देतो,त्यासाठी मार्चपूर्वी आवश्यक असलेला प्रस्ताव द्या,अशा सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिल्या.दरम्यान त्यांनी यावेळी पंचायत समिती इमारतीसह येथील तहसीलदार इमारतीची पाहणी केली.यावेळी पंचायत समितीचे अधिकारी मनोज कल्याणकर यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली.
यावेळी आमदार दीपक केसरकर,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,तहसीलदार राजाराम म्हात्रे,पंचायत समिती सभापती मानसी धुरी,उपसभापती शितल राऊळ,जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.