*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयांमध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबीनारचे आयोजन…*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये २४ ऑक्टोबर रोजी विविध विषयावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा मराठी, हिंदी, इंग्रजी व आय. क्यू. ए. सी. विभागामार्फत या वेबीनारचे आयोजन करण्यात आले असून या वेबीनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सतीश कामत असणार आहेत. तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीकांत आपटे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून सेक्रेटरी मनीष गांधी व खजिनदार समीर मांगले हे उपस्थित असणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय वेबीनारसाठी डॉ. जनिका फर्नांडिस, ग्रंथपाल आणि संशोधक रोहॅम्टन ग्रंथालय, लंडन(यु.के.) तसेच.डॉ.किन्नरी ठक्कर,(मुंबई विद्यापीठ कॉमर्स विभागप्रमुख) हे संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित असणार आहेत.
या चर्चासत्रास ग्रंथपाल, प्राध्यापक, संशोधक, संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, भूगोलप्रेमी,पर्यावरणप्रेमी,तंत्रज्ञ, निसर्गशास्त्रज्ञ तसेच विद्यार्थी उपस्थित राहू शकणार आहेत. तरी या वेबिनारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी केले आहे.
या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होऊन शोधनिबंध सादर करणाऱ्या अभ्यासकांचे निबंध हे दर्जेदार नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.