*कोकण Express*
*आंबोलीत भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
*आंबोली ः प्रतिनिधी*
आंबोली येथील भाजप कार्यकर्त्यानी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे,विभागप्रमुख शशिकांत गावडे, संतोष पाताडे,उपविभाग प्रमुख उत्तम पारधी,तालुका प्रमुख रुपेश राऊळ आणि जिल्हा प्रमुख संजय पडते ,हेमंत नार्वेकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी तुकाराम गावडे, सुनील गावडे,सुनील राऊत,चंद्रकांत गावडे, शंकर कालेलकर,जयसिंग गावडे, देऊ यमकर,देऊ जंगले,महेश राऊत,प्रवीण खरुडे,अविनाश गावडे, जानू यमकर,शाहू लांबर,नाऊ पटकारे यांनी शिवबंधन बांधून प्रवेश केला.यामुळे आंबोलीत भाजपला धक्का दिला आहे.कामे होत नसल्याने आणि सेनेच्या माध्यमातून आणि दिपकभाई यांच्या माध्यमातून कामे होतील असा विश्वास असल्याने पक्ष प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यानी सांगितले. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी सेनेच्या माध्यमातून त्यांची तसेच येथील कामे होतील त्यासाठी निधी आणि पाठपुरावा आम्ही करू असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.