सिंधुदुर्गात मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वच्छता सर्वेक्षण सुरू

सिंधुदुर्गात मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वच्छता सर्वेक्षण सुरू

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वच्छता सर्वेक्षण सुरू…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२२:*

आपला जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत केंद्रिय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता सर्वेक्षण ग्रामिण २०२१ ची घोषणा करण्यात आले असुन जिल्हावासियांना थेट सहभाग घेण्याकरीता मोबाईल ॲपच्या माध्यमातुन सर्वेक्षण सुरु आहे. जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन आपले मत नोंदवुन जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ पुन्हा एकदा स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.
केंद्रिय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने ९सप्टेंबर २०२१ पासुन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचे गुणाकण सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस करीता ३५० गुण, थेट निरिक्षण ३०० गुण, नागरिकांचा प्रतिसाद ३५० गुण या प्रमाणे होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नागरिकांचा जास्तित जास्त सहभाग मिळविण्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाईन प्रतिसाद नोंदविण्याकरीता गुगल प्ले स्टोअर मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण 2021 करीता SSG 2021 हे ॲप्लिकेशन सुरु केले आहे. SSG 2021 हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर डाऊनलोड करुन विचारलेल्या 5 प्रश्नाची उत्तरे देणे गरजेचे आहे. या प्रश्नामध्ये कुंटुंबाकडुन शौचालयाचा वापर 80 गुण, घनकचरा व्यवस्थापन पुढाकार व सुरुवात 80 गुण, सांडपाणी व्यवस्थापन पुढाकार व सुरुवात 80 गुण, स्वच्छता सुविधामध्ये सुधारणा 30 गुण, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे काम समाधानकारक 30 गुण जिल्ह्याला मिळणार आहेत.
स्वच्छता क्षेत्रात जिल्ह्याचे नाव देशात प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी जिल्हावासियांनी गुगल प्ले स्टोअर वरुन SSG 2021 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन आपल्या प्रतिक्रिया नोदवाव्यात असे आवाहन अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!