तिलारी धरण क्षेत्रातील इम्युटमेंट पार्क प्रकल्पाला मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे

तिलारी धरण क्षेत्रातील इम्युटमेंट पार्क प्रकल्पाला मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे

*कोकण Express*

*तिलारी धरण क्षेत्रातील इम्युटमेंट पार्क प्रकल्पाला मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे*

*सिसट्युला ट्युलिप सीईओ माईक बेरी यांनी केली पाहणी;आ केसरकर यांची उपस्थिती*

*दोडामार्ग ः प्रथमेश गवस*

तिराळी धरण क्षेत्रातील इम्युटमेंट पार्क प्रकल्पाला मूर्त स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली असून आज आमदार दिपक केसरकर यांसह आंतराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार परीक्षक तथा समीक्षक व या प्रकल्पाचे काम करण्यास इच्छुक असलेल्या सिसट्युला ट्युलिप या संस्थेचे सी ई ओ माईक बेरी यांनी पाहणी केली, सदर प्रस्तावित जागा ही या प्रकल्पास योग्य असून अद्ययावत व आशियातील क्रमांक एकचे अम्युझमेंट पार्क करण्याचा आपला मानस असून गार्डन, फिल्मसिटी याचबरोबर व्यवसाय पूरक लहान उद्योग, स्थानिक लोकांची कलाकुसर तसेच भारतातील पहिले फिल्म प्रशिक्षण देणारे केंद्र या ठिकाणी बनवणार असल्याचे माईक बेरी म्हणाले, आमदार दिपक केसरकर यांच्यामुळे हे शक्य होत असून त्यांनीच आपल्याला हे निसर्ग सौंदर्य दाखवले याचा उपयोग इथल्या लोकांच्या उपजीविकेसाठी करूया यातून रोजगार निर्मिती होईल असे त्यांनी स्पष्ट केले.तर आमदार दिपक केसरकर यांनी आपला हा ड्रीम प्रोजेक्ट असून सर्वपक्षीय व स्थानिक लोकांनी ह्या प्रकल्पासाठी साथ देण्याची विनंती केली. हा प्रकल्प झाल्यास रोजगार निर्माण होईल २०२३ पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करू असेही ते म्हणाले, यावेळी व्यासपीठावर माईक बेरी यांसह आमदार दिपक केसरकर, तहसीलदार अरुण खानोलकर, जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी, सभापती संजना कोरगांवकर, उपसभापती सुनंदा धर्णे, संतोष मोर्ये, भगवान गवस, रामदास मेस्त्री, जलसंपदा विभागाचे रोहित कोरे, वनविभागाचे शहाजी नारनवार श्री गुदिन्हो आदी उपस्थित होते. यावेळी अनिशा दळवी व बाबुराव धुरी व संजना कोरगांवकर यांनी ह्या प्रकल्पाचे स्वागत करताना हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा त्याला स्थानिकांची साथ लाभेल आपण हव्या त्या सहकार्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी जैवविविधता व नैसर्गिकपणा टिकवून हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तिराळी धरणाच्या व्ह्यू पॉईंटवरून जलाशय तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी करण्यात आली. या निसर्ग सौंदर्याने आपणाला भुरळ घातली असल्याचे सांगत ह्या निसर्गाचा उपयोग हा इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी व्हावा असेही यावेळी माईक बेरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!