मायनिंगमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्या…

मायनिंगमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्या…

*कोकण Express*

*मायनिंगमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्या…*

*परशुराम उपरकर यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…*

*सिंधुदुर्गनगरी*

दोडामार्ग-कळणे मायनिंग प्रकल्पात झालेल्या भूस्खलनामुळे शेती-बागायतीत माती जाऊन नुकसान झालेल्या संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
त्यात असे म्हटले आहे की,कळणे खाण प्रकल्पातील अतिवृष्टीमुळे अनेकदा भराव वाहून जावून खाणीच्या पाण्याचा बांध फुटून शेतकऱ्यांच्या घराचे,घरातील वस्तूंचे नुकसान झालेले असून त्यांच्या जमिनीच्या फळझाडे व शेती याचे नुकसान झालेले आहे . सदर भरपाई शासनाने मूल्यांकन करुन भरपाई कंपनीकडे मिळणेकरीता १५ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते . सदर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचे मान्य केलेले होते. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.या झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महसूल विभाग , बांधकाम विभाग, कृषी विभाग यांच्याकडून मूल्यांकन करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेश व्हावेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी खाणितील माती जावून दुषित झालेले आहे. सदर पाणी पिण्याजोगे नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत असून पिण्याच्या पाण्याची कंपनी मार्फत तातडीने टँकर किंवा अन्य मार्गाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात यावी, अन्यथा मनसेच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळण्याकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!