*कोकण Express*
*कणकवलीतील मटण – चिकन व्यावसायिकांना मुख्याधिकार्यांच्या नोटीसा*
*मटण व चिकन विक्रेत्यांनी स्वच्छतेचे पालन करण्याच्या अनुषंगाने नोटिसा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील मटण व चिकन विक्रेत्यांना नगरपंचायत कडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मटण व चिकन विक्रेत्यांकडून त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने स्वच्छतेचे पालन करण्याच्या अनुषंगाने या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सध्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळत असल्याने खबरदारीच्या अनुषंगाने या नोटिसा देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वच्छते बाबत नियमानुसार पालन न केल्यास सदर व्यवसाय सील करण्याचा इशारा कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी या नोटीस द्वारे कणकवली शहरातील चिकन मटन व्यवसायिकांना दिला आहे. कणकवली शहरातील मटण – चिकन व्यावसायिकांना सोमवारपासून या नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी, व्यवसायिकांनी त्यांच्याकडे गोळा होणारा कचरा वर्गीकरण करूनच न प स्वछता कर्मचाऱ्याकडे द्यावा. मटण – चिकन विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. तसेच खराब झालेल्या मांसाची विक्री करू नये, या विक्रेत्यांनी सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी, नगरपालिका अधिनियम 270 – अ प्रमाणे दगडी फरशी किंवा इतर फरशी दुकानाच्या परिसरात वापरण्यात यावी. याचा अवलंब न केल्यास सदर व्यवसाय सील करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिला आहे.