*कोकण Express*
*जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या चिपी विमानतळाचे “सिंधुदुर्ग एअरपोर्ट” असे नामकरण*
रविकिरण तोरसकर; जिल्ह्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर येईल…
*मालवण ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात नव्याने सुरू होणाऱ्या चिपी विमानतळाचे “सिंधुदुर्ग एअरपोर्ट” असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्र सरकारने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव आता जागतिक पर्यटन नकाशावर येईल, असा विश्वास निलक्रांती पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला. दरम्यान याच माध्यमातून या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद इतिहास सुद्धा जगासमोर येईल, असेही त्यांनी म्हणाले आहे. याबाबत श्री.तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळाला सिंधुदुर्ग एअरपोर्ट असे नाव द्या, अशी मागणी पर्यटन क्षेत्र तसेच शिवप्रेमी कडून होती. तर गेली साडेतीनशे वर्षे अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्वराज्य या संकल्पनेचे प्रतीक असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग या जलदुर्गाचे नाव प्रस्तावित विमानतळाला द्यावे, ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर २०
२१ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार विमानतळाचे नाव “सिंधुदुर्ग एअरपोर्ट” असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर येण्याबरोबरच येथील पर्यटनाला होणार आहे.