मडूरा तिठा परिसरातील गॅरेजमधून मोटरसायकल चोरीस

मडूरा तिठा परिसरातील गॅरेजमधून मोटरसायकल चोरीस

*कोकण Express*

*मडूरा तिठा परिसरातील गॅरेजमधून मोटरसायकल चोरीस…*

*बांदा  ःःप्रतिनिधी* 

मडूरा तिठा येथील नाईक आँटोमोबाईल्समध्ये दुरुस्तीकरिता ठेवलेली बॉक्सर ऐटी मोटरसायकल (एमएच ०७ ई १२९१) अज्ञात चोरट्याने पळवून नेली आहे. तशी फिर्याद बांदा पोलीसात दाखल करण्यात आली आहे. गॅरेज मालक दिनेश नाईक यांच्या वडिलांचे निधन झाल्याने गॅरेज बंद होते. ही संधी साधून गॅरेज बाहेर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. सदर क्रमांकाची मोटरसायकल कोठेही आढळल्यास बांदा पोलीस (०२३६३ -२७०२३३) किंवा दिनेश नाईक (९४२११४५३१४) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!