कारीवडेतील बेपत्ता युवकाची ओटवणे नदीजवळ सापडली कार

कारीवडेतील बेपत्ता युवकाची ओटवणे नदीजवळ सापडली कार

*कोकण  Express*

*कारीवडेतील बेपत्ता युवकाची ओटवणे नदीजवळ सापडली कार…*

*“सुसाइड नोट” सापडल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधाशोध सुरू…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शहरातील एका खाजगी बँकेत कामाला असलेल्या कारीवडे येथील युवकाची ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली आहे. मनोहर गावडे (३५) असे त्याचे नाव आहे. दरम्यान गाडीत सुसाईड नोट सापडली आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

संबंधित युवकाची गाडी त्या ठिकाणी संशयास्पद दिसली. त्यामुळे ग्रामस्थांनी माहिती दिल्या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्याचा शोध सुरू असून अद्याप पर्यंत यश आलेले नाही. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार बाबू तेली यांनी दिली.

त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित युवक हा सावंतवाडी आयसीआयसीआय बँकेत कामाला होता. त्या ठिकाणी काम करत असताना काल सायंकाळी आपले बांदा येथे काम आहे. त्यामुळे आपण तिथे जाणार आहे, असे सांगून आपल्या पत्नीला त्याने रात्री उशिरा सोनुर्ली येथे सासरवाडीत येणार असल्याचे सांगितले. मात्र तो उशिरा पर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे पत्नीने सकाळी येथील पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद दिली. त्यानंतर काही वेळातच ओटवणे नदीजवळ त्याची कार आढळून आली आहे. त्यात सुसाईड नोट आहे. त्यामुळे त्याचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!