शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा झंझावती गणपती दर्शन दौरा

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा झंझावती गणपती दर्शन दौरा

*कोकण  Express*

*शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा झंझावती गणपती दर्शन दौरा*

*एकाच दिवशी देवगड तालुक्यातील घेतले तब्बल 150 गणरायांचे दर्शन*

*देवगड ः प्रतिनिधी*

शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी देवगड तालुक्यातील अनेक गावातील घरगुती गणरायांचे पदाधिकाऱ्यांसोबत दर्शन घेतले. देवगड तालुक्यातील शिरगाव, तळेबाजार, जामसांडे, देवगड शहर, कुणकेश्वर, तारामुंबरी, मिठमुंबरी, खवळे महागणपती यांसह अनेक गावातील गणरायांचे दर्शन घेतले.
संदेश पारकर यांच्या या झंझावाती देवगड दौऱ्यात एकाच दिवशी तब्बल 150 घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी नवसाला पावणाऱ्या खवळे महागणपतीचे तसेच 370 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गोळवणकर यांच्या गणपतीचे आणि उद्योजक श्री.नंदूशेठ घाटे यांच्या देखील दर्शन श्री.पारकर यांनी घेतले.
यावेळी श्री.पारकर यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणुन घेऊन खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, नगरसेविका हर्षा ठाकुर, नगरसेवक विकास कोयंडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रवी जोगल, बुवा तारी, अमित साळगावकर, शिवसेना शहरप्रमुख संतोष तारी, युवासेना शहरप्रमुख सौरभ माने, लक्ष्मण तारी, अमोल लोके, संजय वाळके, बाळू बांधकर, दिनेश पारकर, महेंद्र भुजबळ, चिन्मया ठाकुर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!