*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन जनतेला सुख-समृद्धी ऐश्वर्य आणि महामारी पासून सुटका मिळू अशी प्रार्थना श्रींच्या चरणी केली.
कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या चरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आज शनिवारी नतमस्तक झाले यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, शिवाजी घोगळे, अल्पसंख्यांकांचे नजीर शेख, सर्वेश पावसकर, उत्तम सराफदार, अशोक कांदे, जय राम डिग्रस कर उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग राजाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ होऊ दे तसेच जिल्ह्यातील जनतेला सुख समृद्धी ऐश्वर्या लाभू दे आणि करुणा महामारी पासून सुटका होऊ दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी स्वागत करून त्यांना श्रींचा प्रसाद दिला यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगरसेवक राकेश कांदे, विजय कांबळी उपस्थित होते.
फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना श्रीफळ देताना जिल्हा परिषदेतील गटनेते रणजित देसाई.