*कोकण Express*
*बेळणे खुर्द ग्रा. पं. मार्फत राबविण्यात आली स्वच्छता श्रमदान मोहीम*
भारताच्या 75 व्या स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर, 2021 रोजी कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द ग्रामपंचायत येथे स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छ्ता श्रमदान मोहिम राबविण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता करण्यात आली.
यावेळी सरपंच दीक्षा दीपक चाळके, ग्रामपंचायत सदस्य सुधा सूर्यकांत चाळके, ग्रामस्थ विशाखा चाळके, अर्चना चाळके, स्वाती चाळके, शशिकला पवार, सत्यवान चाळके, दीपक गोविंद चाळके, प्रकाश चाळके, किशोर चाळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.