*कोकण Express*
*नांदगाव आरोग्य केंद्रात डॉ. तपसे पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेत रुजू*
कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असलेले डॉ दत्ता तपसे हे मागील वर्षी पुढील शिक्षणासाठी व नांदगाव येथील त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने नांदगाव आरोग्य केंद्रातून कार्यमुक्त झाले होते. नांदगाव येथे त्यांनी सुरुवातीच्या कोरोना काळात रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिली होती. त्यामुळे नांदगाव वासियांना तपसे यांनी नांदगाव येथेच थांबावे, असे वाटत होते. कार्यमुक्त झाल्यावर किशोर मोरजकर ट्रस्टमार्फत तपसे यांचा यथोचित सन्मान करुन सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित नागरिकांना ‘या आरोग्य केंद्रात पुन्हा नक्की येईन, असे आश्वासन तपसे यांनी दिले होते. हे आश्वासन देऊन दिड वर्ष पूर्ण होताच त्यांना नांदगाव येथील आरोग्य केंद्रात रुजू होण्यासाठी आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे डॉ. तपसे हे पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेसाठी नांदगाव येथे रुजू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तपसे गेले दीड वर्ष यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी-चिंचवड पुणे येथे कार्यरत होते. यानंतर पुन्हा एकदा ते नांदगाव