*कोकण Express*
*नांदगाव येथील हायवे कामांबाबतचा प्रश्न सुटणार कधी ?*
*स्ट्रीट लाईट साठी ओढलेली केबल पडलीय पुलाच्या खाली*
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील मुंबई गोवा महामार्गावरील पेडींग कामे वाढतच चालली आहेत. नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा या दोन्ही ठिकाणच्या सर्व्हीस रोडचा प्रश्न काही सुटता सुटेना, अशी अवस्था झाली आहे. यातच पुलावर गेल्या वर्षीपासून स्ट्रीट लाईट साठी पोल उभारण्यात आले असून पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र ते पथदिवे सुरू कधी होणार, याबाबत मात्र नांदगाव वासियांना प्रतिक्षाच करावी लागत आहे. ट्रान्सफॉर्मसाठी जागा उपलब्ध नसल्याने अद्याप पथदिवे बंद आहेत. पथदिव्यांसाठी ओढून ठेवण्यात आलेली विद्युत केबल नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली केव्हापासून अर्धवट स्थितीत पडलेली आहे आणि संबंधितांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. बहुतेक पुलावरून वाहतूक सुरू झाली असतानाच नांदगाव तिठा येथील सर्व्हीस रोडचा प्रश्न अजून मिटला नसून मुख्य वाहतूक एकाच सर्व्हीस रोडने सुरू करण्यात आली आहे.
हायवे कामांबाबत नांदगाव येथे एवढ्या समस्या निर्माण व्हायचे कारण काय ? दोन्ही ठिकाणच्या पुलाजवळील सर्व्हीस रोडचा प्रश्न सुटणार कधी