फोंडाघाट गावात पावसाच्या अतिवृष्टीमुळे विहिरीचा भाग कोसळला

फोंडाघाट गावात पावसाच्या अतिवृष्टीमुळे विहिरीचा भाग कोसळला

*कोकण Express*

*फोंडाघाट गावात पावसाच्या अतिवृष्टीमुळे विहिरीचा भाग कोसळला*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी संजना हळदिवे*

फोंडाघाट गावातील मारुती वाडी येथील प्रकाश शितोळे यांच्या घराबाहेरील विहिरीचा काही भाग पावसाच्या अतिवृष्टीमुळे विहिरीच्या पाण्यात कोसळला. त्यामुळे विहिरीचे भरपूर नुकसान झाले आहे. तेथील राहणाऱ्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथील नागरिकांकडून विहीर दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट गावाचे तलाठी यांनी विहिरीची पाहणी करून विहिरीच्या नुकसानाची पंच यादी तयार केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल, फोंडाघाट ग्रामसेवक चौकेकर, माजी उपसरपंच सुभाष सावंत, राजन नानाचे, संजय हळदीवे, राजेश शिरोडकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!