*कोकण Express*
*भंगसाळ नदीवरील गणेश घाट तोडणा-या ठेकेदारावर कारवाई करा*
*मुख्याधिका-यांवर कोणाचा दबाव आहे का, प्रशासनाला सवाल…*
*कुडाळ नगरसेवक राकेश कांदे*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भंगसाळ नदीवरील गणेश घाट तोडून रस्त्याची दुर्दशा करणार्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी केली आहे. दरम्यान त्या बंधा-याची विल्हेवाट लावणाऱ्या ठेकेदारावर अद्यापपर्यंत कारवाई होत नाही. त्यामुळे मुख्याधिका-यांवर कोणाचा दबाव आहे का, की संबंधित ठेकेदार कोणाचा नातेवाईक आहे?, असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
याबाबत श्री. कांदे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की शहरातील भंगसाळ नदीवरील बंधार्याचे काम बरीच वर्षे रखडत रखडत चालू होते. संबंधित बंधाऱ्याच्या ठेकेदाराने काम करतेवेळी कुडाळ नगरपंचायतीच्या अखत्यारीत असणार्या ग्रामपंचायत कालीन बांधलेल्या गणेश घाटाचेचे नुकसान करून गणेश घाटाची तोडमोड केली.तसेच तेथून जाणाऱ्या रस्त्यांवरून आपले जेसीबी, डंपर ,फोकलँण्ड व इतर वाहने त्या नदीपात्रात उतरवली. मात्र पुन्हा तो गणेश घाट सुस्थितीत करायचे सोडून हा ठेकेदार गायब झाला. वास्तविक सार्वजनिक मालमत्तेची कोणी नुकसान केले तर त्यांच्यावर प्रशासन गुन्हा दाखल करते. परंतु या ठेकेदारावर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल कर संबंधितावर तात्काळ कारवाई करा,अशी मागणी त्यांनी केली आहे.