*कोकण Express*
*पर्यटन पुरस्कारांसाठी 21 सप्टेंम्बर पर्यंत माहिती पाठविण्याचे फेडरेशनतर्फे आवाहन…….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सर्व स्तरातील पर्यटन वृधिंगत होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास फेडरेशन तर्फे विविध क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकाना दरवर्षी 27 सप्टेंबर च्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून विशेष पुरस्काराने
येते. त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा गौरविणयात येणार असल्याने जिल्हयातील पर्यटन व्यावसायिकानी आपली माहिती फेडरेशनकडे येत्या दिनांक 21 सप्टेंम्बर पूर्वी पाठवावी.असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर, सचिव श्री.नितीन तलेकर व श्री. यशवंत आमोणेकर यांनी केले आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जदारातून प्रत्येक प्रकारच्या एका पुरस्कारकर्त्याची निवड केली जाईल.
गेली 2 वर्षे कोरोनामुळे पर्यटन दिनाचे सर्व कार्यक्रम रदद् करावे लागले होते. परंतु यावर्षी कोरोनाचे शासकीय नियम पालून अत्यंत मोजक्या पुरस्कार विजेत्याना निमंत्रित करुंन पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
सदरील पुरस्कारामध्ये 1).बेस्ट हॉटेल पुरस्कार,2)बेस्ट हॉस्पिटयालिटी पुरस्कार3)बेस्ट सर्विसेस पुरस्कार,4)बेस्ट फूड पुरस्कार,5)बेस्ट गाईड पुरस्कार,6)बेस्ट बॅक वॉटर पुरस्कार,7)बेस्ट ऑग्रो टूरिज़म पुरस्कार,8)बेस्ट मेडिकल टूरिझम पुरस्कार9)साहस शौर्यवीर पुरस्कार व 10) बेस्ट पर्यटन स्थळ चित्रीकरण पुरस्कार .इत्यादी पुरस्कार,तसेच सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व शाल श्रीफल देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील पर्यटन व्यावसायिकानी आपली माहिती लवकरात लवकर श्री. चंद्रशेखर उपरकर मु .पो.ता. कणकवली(तेलिआळी)9022621723 या पत्त्यावर बंद लखोटयातून पाठवावी असे आवाहन फेडेरेशनतर्फे करण्यात आले आहे.