*कोकण Express*
*विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर*
*मुंबई, दि. ८ सप्टेंबर -*
राज्यात रुग्णसंख्या कमी होत असताना या रुग्णसंख्येत मध्येच वाढ होताना दिसून येत आहे. आता दुसरी लाट ओसरत आहे. त्याचवेळी तिसऱ्या लाटेचा धोकाही देण्यात आला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचं प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागात कोविड सेंटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग येथील कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यासाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या ९ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी १० वाजता हॉटेल लेमन ग्रास येथे त्यांची पत्रकार परिषद आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय ओरस येथे विधानपरिषद आमदार स्थानिक विकास निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड १९ हेल्थ केअर सेंटरचा ( डिसीएचसी )ऑनलाइन लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.