*कोकण Express*
_*अखेर साळगांव माऊली मंदिर व जांभरमळा स्टाॅप मिडलकट बंद*_
काही दिवसांपूर्वी साळगांव माऊली मंदिर स्टाॅप नजीकचा मिडलकट नॅशनल हायवे अॅथाॅरीटीने बंद केला होता.पण नजिकच्या एका हाॅटेल चालकाने आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी हा मिडलकट तोडून टाकला होता.त्यामुळे त्याठिकाणी एक जबरदस्त अॅक्सिडेंट होऊन साळगांव येथील टिळवे नावाच्या व्यक्तीचा नाहक मृत्यू झाला होता. त्यामुळे हे धोकादायक मिडलकट बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आली होती.त्याची दखल घेऊन
अत्यंत धोकादायक बनलेले मिडलकट नॅशनल हायवे अॅथाॅरीटीने बंद करून सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद.तसेच सहकार्य अन्य ठिकाणी ओपन असलेले मिडलकट व स्थानिक ग्रामस्थांनीआपल्या टूव्हिलर व फोर व्हिलर साठी शाॅट कट मार्ग तयार करून अपघाताना निमंत्रण देऊन ठेवले आहे.तेही तातडीने काढून टाकून जनतेचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी केली असून हे अडथळे दूर करताना कोणी विरोध केला कायदेशीर कारवाईचा अवलंब करून गुन्हे दाखल करा.राष्ट्रवादी काँग्रेस हायवे अॅथाॅरीटी बरोबर आहे.मिडलकट तसेच काही ठिकाणी आपल्या सोयीसाठी केलेले सर्व मार्ग बंद करून सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी केली आहे.