*कोकण Express*
*वैभववाडी कोकिसरे बांधवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश….*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
माननीय शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, खासदार श्री. विनायक राऊत, पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कोकिसरे बांधवाडी येथील ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश सावंत, युवानेते श्री. संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या वेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री यांचे कार्य कौतुकास्पद आहे कारण कोरोनासारख्या संकटाच्या कालावधीत सुद्धा त्यांनी केलेल काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचे आहे. देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे याचा सार्थ अभिमान आपल्यासारख्या सर्व शिवसैनिकांना असला पाहिजे.
त्याच प्रमाणे गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री उदजी सामंत, खासदार विनायक राऊत साहेब , माजी पालकमंत्री,आमदार दीपकभाई केसरकर, आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला. कोकिसरे बांधवाडी येथील ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने पक्षात प्रवेश केला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, त्याचप्रमाणे उर्वरित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. यासाठी आपण सर्व शिवसैनिकांनी एकोप्याने काम करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत.
या नंतर बोलताना संदेश पारकर म्हणाले की, शिवसेना ही 80% समाजकारण 20 % राजकारण करणारी संघटना आहे , प्रत्येक शिवसैनिक हा संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन काम करत असतो. आतापर्यंत आपल्या मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीबद्दल सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त शासकीय मदत देण्यात आली आहे.तसेच पुरहानी साठी देखील जास्तीत जास्त मदत करण्यात येत आहे. अशा प्रकारची एवढी मोठी मदत यापूर्वी मिळाली नव्हती.
प्रवेश केलेल्या सर्वांना शुभेच्छा देऊन संघटना वाढीसाठी सर्वांनी प्रमाणिक प्रयत्न करावेत अस आव्हान यावेळी संदेश पारकर यांनी केले.
*यावेळी तालुका प्रमुख – मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख – नंदू शिंदे, माजी जि प उपाध्यक्ष – संदेश पटेल, बँक संचालक – दिगंबर पाटील , युवासेना जिल्हा चिटणीस – स्वप्नील धुरी, उपतालुका प्रमुख – दिलीप नारकर, राजाराम गडकर, माजी उपसरपंच – श्रीकांत डाफळे, चंद्रकांत आमरस्कर, सुरेश पाळये, यशवंत गवाणकर, उमाकांत राणे यांसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.