कोविडची लस “मातोश्रीवर” तयार होते हा गैरसमज नाईक, पारकर यांनी दूर करावा

कोविडची लस “मातोश्रीवर” तयार होते हा गैरसमज नाईक, पारकर यांनी दूर करावा

*कोकण  Express*

*कोविडची लस “मातोश्रीवर” तयार होते हा गैरसमज नाईक, पारकर यांनी दूर करावा*

*गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती मेघा गांगण यांचे प्रत्युत्तर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसी चा पुरवठा हा राज्य सरकार कडून नाही तर केंद्र सरकार च्या माध्यमातून केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोविड लसीचा पुरवठा केल्याचे सांगणाऱ्या अपरीपक्व नगरसेवक सुशांत नाईक व कन्हया पारकर यांनी मातोश्रीवर लस तयार होते हा त्यांचा झालेला गैरसमज दूर करावा असा टोला सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती मेघा गांगण यांनी लागवला आहे. ज्यावेळी सुरुवातीच्या टप्यात सिंधुदुर्गात लसीचा तुटवडा भासत होता तेव्हा शिवसेनेचे नेते केंद्र सरकारच्या नावाने गळा कढत होते. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे याचे जि. प अध्यक्षा संजना सावंत यांनी लक्ष वेधल्यानंतर सिंधुदुर्गाला जादा लसीचे डोस उपलब्ध झाले. पण जेव्हा जिल्ह्यात जादा लस मिळू लागली तेव्हा केंद्राच्या नावाने गळा काढणारे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री यांनी लस दिल्याचे सांगू लगले. हा इतिहास पण जनतेला माहीत आहे. त्यामुळे नाईक, पारकर यांचा दुटप्पी पणा कणकवलीतील जनतेने ओळखला असल्याची टीका श्री कामतेकर, सौ गांगण यांनी केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हे कणकवली शहरातील जनतेला मिळावे म्हणून नगरपंचायत च्या वतीने स्वतंत्र 400 डोस नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जि प अध्यक्ष संजना सावंत यांच्य माध्यमातून मागणी केले होते. त्याचे नियोजन देखील करण्यात आले. पण कणकवली शहरात या विध्वंसक अ”वैभव”शाली परंपरेचा “संदेश” देणाऱ्या अपप्रवृत्तींनी नेहमी प्रमाणे श्रेया साठी विरोध केला. अधिकाऱ्यावर दबाव आणत तक्रारीची धमकी देत हे लसीकरण रद्द करण्यास भाग पाडले. ज्या लसिकरणाचे सत्र रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले ती लस मातोश्रीवर किंवा नाईक, पारकर यांच्या घरी बनत नाही. तर केंद्र सरकार राज्याला लस देते. व राज्य जिल्ह्याला लसीचे वितरण करते. जिल्हा स्तरावरून प्रशासन ही लस केंद्र निहाय वितरण करते. व ज्या प्रशासना मार्फत लस वितरण केली जाते त्या प्रशासनाच्या प्रक्रियेच्या प्रमुख या जि. प. अध्यक्ष असतात. पण हे वरचा मजला रिकामा असणाऱ्यांना सांगून काय फायदा? असा टोला श्री कामतेकर, सौ गांगण यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!