खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर थांबलेल्या पहिल्या सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ट्रेन चे दिमाखात स्वागत

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर थांबलेल्या पहिल्या सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ट्रेन चे दिमाखात स्वागत

*कोकण  Express*

*खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर थांबलेल्या पहिल्या सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ट्रेन चे दिमाखात स्वागत*

*अनेक वर्षांपासून मागणीला यश ; संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझी !*

​*खारेपाटण ः प्रतिनिधी*

​गेली अनेक वर्षांपासून मागणी असलेले तसेच  खारेपाटण सह आजूबाजूच्या ४० ते ६० गावांना फायदेशीर व सोयीचे  ठरणारे बहुचर्चित व प्रलंबित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारा वरील चिंचवली येथील कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर आज प्रथमच सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गणपती स्पेशल गाडी थांबविण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग  जि प अध्यक्ष सौ. संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला थांबलेल्या पहिल्या ट्रेनचे शानदार स्वागत करण्यात आले. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या  व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष नासिरभाई काझी यांनी यावेळी दिली.
खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन  वर आज पहिल्या थांबलेल्या रेल्वेचे स्वागत कर्यक्रमाला जि प अध्यक्ष संजना सावंत जि प स्थायी समिती अद्यक्ष तथा माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, पंचायत समिती सदस्य सौ तृप्ती माळवदे,खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी सचिव – सूर्यकांत भालेकर कणकवली प स माजी सभापती दिलीप तळेकर,माजी जि प महिला बालकल्याण सभापती श्रीम रत्नप्रभा वळंजू,चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर,नडगिवे उपसरपंच अरुण कर्ले,खारेपाटण तालुका कृती समिती चे पदाधिकारी मंगेश गुरव,​ ​रवींद्र मांजरेकर,​ ​संतोष पाटणकर ,चिंचवली तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर भालेकर आदी मान्यवर व दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
खारेपाटणच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांने कोरोव असा आजचा दिवस असल्याने खारेपाटण  वासीयांचे गेले अनेक वर्षाचे स्वप्न यानिमिताने साकार झाल्याने ग्रामस्थमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. सिंधुदुर्ग जि प अध्यक्ष   सौ संजना सावंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन वर पहिल्या थांबलेल्या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. तर खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी जि प स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र जठार यांच्या शुभ हस्ते  पहिल्या ट्रेनचे खारेपाटण येथे मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच सावंतवाडी – दिवा  पॅसेंजर गाडीचे मोटरमन यांचे जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन येथून पहिला प्रवास करण्याचा मन चिंचवली भंडारवाडी येथील रहिवासी निकष वैजनाथ मगर याना मिळाला.त्यांनी खारेपाटण ते पनवेल असे खारेपाटण रेल्वे स्टेशनवरून ऑनलाइन तिकीट घेऊन सावंतवाडी –  दिवा पॅसेंजर गाडीने प्रवास केला. श्री मगर यांचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर सतीश कुंभार यांचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या पदाधिकऱ्यांचा  वतीने स्वागत करण्यात आले​ ​व त्यांना त्यांच्या कामासाठी ​शुभेच्छा देण्यात आल्या.

” आज आम्हाला खूप आनंद होत आहे.की खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थां सह घेऊन गेली २० वर्षे ज्या ज्या चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन साठी आंदोलन, चळवळ, सभा ,बैठक लढा देत होतो त्याला खऱ्या आज यश मिळाल्याचे समाधान आहे. खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ,देवगड व वैभववाडी तसेच रत्नगिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्या सह आजूबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांना खारेपाटण रेल्वे स्टेशन फायदा होणार असून भविष्यात हे  रेल्वे स्टेशन दशक्रोशीतील नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीचे केंद्रबिंदू ठरणार आहे. तसेच या रेल्वे स्टेशनला  आवश्यक असणारा प्लँटफॉर्म  बांधण्यात आला नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.याबाबत सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री दानवे साहेब तसेच केंद्रीय उद्योग मंत्री नामदार राणे साहेब यांच्याशी बातचीत करन खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चे प्लॅटफॉर्म चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.”—- नासिर काझी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!