*कोकण Express*
*मनसेतर्फे गणेश चतुर्थीनिमित्त विलवडे, ओटवणे गावात जीवनावश्यक वस्तूचे वाटप…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गणेश चतुर्थीनिमित्त विलवडे, ओटवणे गावातील४५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले श्री विवेक केळुसकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई विरार महानगरपालिका मनसे सचिव, राज्य उपाध्यक्ष वाहतूक सेना तथा अध्यक्ष व संस्थापक श्री माऊली प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सदर जीवनावश्यक वाटप करण्यात आले यावेळी विलवडे ओटवणे गावातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते तसेच कोरोना ने मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबालाही मदत करण्यात आली मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री धीरज परब यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू देण्यात आलेत तसेच विलवडे येथील पूरग्रस्तांनी नदीतील गाळ तसेच या ठिकाणी एकच महिला कृषी सहाय्यक म्हणून चार गावांसाठी आहे त्यामुळे शेतीचे पंचनामे व्हायला उशीर लागलेत यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा व पुराने नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी विनवणी ही केली तसेच ओटवणे येथील गणेश मूर्तिकार श्री वरेकर यांच्या गणेश मुर्त्या पाण्यामध्ये विरघळले शासनाकडून अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही त्यांचीही विचारपूस करण्यात आली यावेळी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुकाउपाध्यक्ष सुधीर राऊळ, मळेवाड विभाग अध्यक्ष मंदार नाईक, इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, मळगाव शाखाअध्यक्ष राकेश परब, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, श्री वस्कर, सिद्धांत बांदेकर, निलेश वाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पूरग्रस्तांनी श्री विवेक केळुसकर व पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेत.