*कोकण Express*
*गणेश चतुर्थीपूर्वी लसीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 68400 डोस प्राप्त*
*_संजना सावंत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग_*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मोठ्या प्रमाणात लस प्राप्त होत असून. गणेश चतुर्थीपूर्वी लसीकरण व्हावे यासाठी जिल्ह्यास 62हजार कोविड शिल्ड आणि 6400 कोव्हॅक्सिंन प्राप्त झाल्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांनी जाहीर केले. गणेश चतुर्थीपूर्वी हे सर्व डोस जिल्ह्यातील लोकांना देऊन लसीकरण करता यावे याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज असून बुधवार दिनांक 08.09.2021 व गुरुवार दिनांक 09.09.2021 रोजी सर्व डोस ग्रामीण पातळीवर वितरीत करून प्राप्त सर्व डोसच लसीकरण पूर्ण होणार आहे. तरी जिल्हा वासियांनी आवश्यक ती नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील केले आहे.