*कणकवली ः प्रतिनिधी*
युवक कल्याण संघ संचलित, विजयराव नाईक बी. फार्मसी कॉलेज, शिरवल महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हार्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेचा प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष डिग्रीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेमधील प्रथम वर्षातील, संपदा परब ( ९.८१ ), भक्ती वायंगणकर ( ९.७८ ) व मिताली पिळणकर ( ९.६२ ) गुण मिळवून यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय वर्षातील प्रांजल घाडीगावकर आणि प्रमदा नाईक यांनी ( ९.६७ ) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच दिक्षा देटे ( ९.५० ) व पुर्वा गुरव ( ९.४२ ) गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आम वैभव नाईक, उपाध्यक्षा नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य पुजा पटेल, प्रा. अमर कुलकर्णी व प्रा.चंद्रशेखर बाबर, प्रा. मेघा बाणे, प्रा. ऋषीकेश काटकर, प्रा.श्वेता पाटील, प्रा.निशा करंदीकर, प्रा.नमिता सागवेकर, प्रा.प्रणिता चव्हाण सर्व शिक्षकवृंद कौतुक केले.