*अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा चाप….!*

*अवैध लाकूड वाहतुकीला वनविभागाचा चाप….!*

*नांदगाव येथे लाकडासह 5 लाख 25 हजाराचा मुद्देमाल वनविभागाने केला जप्त…!*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभाग आक्रमक झाला असून जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे.नांदगाव येथे लाकडासह 5 लाख 25 हजाराचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.या प्रकरणी फीरोज साटविलकर रा.नांदगाव व कादीर आब्दूल नावळेकर रा.नांदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध लाकूड वाहतुकीच्या विरोधात वनविभागाने आक्रमक भूमिका घेतली असून गेले काही दिवस वन विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक नारनवर, सहा वनसंरक्षक सावंतवाडी जलगावकर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्या आंबा, शिवन लाकूड वाहतुकीला नांदगाव येथे वनपाल अनिल जाधव,वनरक्षक शेगावे वनरक्षक सुतार, वनरक्षक मणेर यांनी आंबा, शिवण अवैध लाकूड वाहतूक करत असताना नांदगाव येथे टेम्पो व लाकूड असा तब्बल 5 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फीरोज साटविलकर रा.नांदगाव व कादीर आब्दूल नावळेकर रा.नांदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो क्र. MH 07 – A J-1607 मधून साग लाकडाची विनापरवाना वाहतूक होत होती. 3 सप्टेंबर रोजी वनविभागाचे पथक वनक्षेत्रपाल यांचे समावेत रात्री ची गस्त घालत असताना रात्रीचे वेळीसदर टेम्पो जप्त करून आतील लाकडासह टेम्पो वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. 5 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 25000 हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अधिक तपास फोंडा वनपाल अनिल जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!