*कोकण Express*
*३३६ रुग्णांनी न.पं.च्या कोविड सेंटरचा घेतला लाभ…!
*भविष्यात कोरोनाचा धोका वाढल्यास कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याची आमची तयारी…!*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेला शासनाने दिलेला कर्मचारीवर्ग १ सप्टेंबरपासून मिळणार नसून तसे पत्रही न. पं. ला प्राप्त झाले आहे. परिणामी सध्या कोविड सेंटर बंद ठेवत आहोत. गेल्या साडेतीन महिन्यात ३३६ रुग्णांनी कोविड सेंटरचा लाभ घेतला.सर्वांच्याच प्रामणिक ‘टिमवर्कमुळे सर्वजण पूर्णतः बरे होऊनच परतले. तसेच भविष्यात कोरोनाचा धोका वाढला कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याची आमची तयारी असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
न.पं.च्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री नलावडे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, मेधा गांगण, अँड.विराज भोसले, संजय कामतेकर, शिशिर परुळेकर, माजी नगरसेवक किशोर राणे, बंडू गांगण, महेश सावंत, आदी उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर कणकवली शहरात कोविड सेंटर उभारलं होते. १६ मे ला चालू केलं होतं, ते ३१ ऑगस्टला बंद करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा आदेश आले आहेत, त्यामुळे बंद करण्यात आले आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून १७ मे पासून ३१ ऑगस्ट पर्यत ३३६ रुग्णांवर उपचार केला. दाखल झालेले सर्व रुग्ण ठणठणीत आहेत, आमच्या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण दगावला नाही, असे समीर नलावडे यांनी सांगितले.
साडेतीन महिन्याचा कालावधी होता. १२ डॉक्टरांनी काम केलं, नर्स ४, वार्डबॉय २ होते. कोविड सेंटर चालू केल्यानंतर दानशूर व्यक्ती व त्यात्यासाहेब मुसळे ट्रस्ट, रोटरी क्लब, उद्योजक यांनी मदत केली. थर्मल गण, बीपी मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन या मशीन दिल्या आहेत.
रोटरी क्लबने जम्बो सिलेंडर, ३३६ वेलकम किट दिले, साज ग्रुप तर्फे जम्बो किट, विद्यामंदिर दहावी बॅच कडून मदत, केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट मास्क, सँनिटायझर, राजु मानकर, संजय कामतेकर, उद्योगपती प्रशांत तेंडुलकर यांनी गोळ्यांचे किट दिले आहेत.
या कालावधीत मुख्याधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत, नगरसेवक सर्वांनी एकत्रित काम केले. डॉ.तायशेट्ये यांनी सेवा दिली. आ.नितेश राणे यांनी परवानगी मिळण्याची मेहनत घेतली, आ.प्रसाद लाड ५ तर नगरसेवक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन दिले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी व जेवण पुरवठा श्री.आचरेकर या सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही यशस्वी कोविड सेंटर चालवू शकलो. असे समीर नलावडे यांनी सांगितले.