*कोकण Express*
*मनसे च्या “भिकमांगो”आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजाविण्यास सुरुवात ; दया मेस्त्री*
माजी आमदार जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील मनसेच्या सर्व तालुकाध्यक्षांनी तालुका उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भीक मांगो आंदोलनाचे निवेदन दिले होते. निवेदनात कोकणात लोकप्रिय असलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यांमध्ये रस्ते शोधण्याची वेळ आलेली आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या माध्यमातून या खड्ड्यांची डागडुजी करून रस्ते सुस्थितीत करावेत अन्यथा मनसे माध्यमातून भीक मांगो आंदोलन करून गावागावातून, शहरातून चिल्लर स्वरूपात भीक गोळा करून सदर गोळा झालेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यास देणार.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मनसेच्या निवेदना नंतर जिल्ह्यात ठीक ठिकाणी खड्डे भरण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र हे खड्डे जांभा दगडाने भरत असून असून ते पुन्हा उखटले जाणारच आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी असली तरीही खड्ड्यांन मधून होणारा प्रवास त्यातून होणारा त्रास कुठेतरी कमी झाला आहे. सध्या त्रासदायक होत असलेली खड्डेमय वाहतूक करताना होणारे अपघात थांबतील.येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुखकर होईल.