*कोकण Express*
*तोंडवलीती लसीकरण मोहीम होण्यासाठी दिले निवेदन पत्र*
*तोंडवली युवासेना तर्फे कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला निवेदन पत्र देण्यात आलं*
प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे व उपकेंद्र वाघेरी अंतर्गत येणाऱ्या तोंडवली गावात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी या साठी तोंडवली मधील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी कासार्डे आरोग्य केंद्राला निवेदन पत्र दिले.
तोंडवली गावातील ग्रामस्थांना लसीकरणासाठी वाघेरी आणि कासार्डे केंद्रावर जावं लागतं हे अंतर तोंडवली गावापासून 10 ते 12 किलोमीटर आहे आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक देखील कमी प्रमाणात असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत त्या मुळे कोणी लस घ्यायला जात नसल्याने तोंडवली गावातच लसीकरण मोहीम राबवून 200 लसीचे डोस उपलब्ध करून घ्यावे अस मत युवासेना उपतालुका प्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी मांडल.
०७ ऑगस्ट २०२१ ला तोंडवली युवासेना तर्फे कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला निवेदन दिले होते त्या निवेदनाचा मान ठेवून आपण तोंडवली गावाला २१ ऑगस्ट रोजी लसीकरण मोहीम साठी 150 डोस उपलब्ध करून दिले होते त्या साठी आपले आभार परंतु अजूनही तोंडवली गावातील काही नागरिकांचे डोस घेणे बाकी आहेत म्हणूनच आपण तोंडवली गावासाठी 200 डोस उपलब्ध करून घ्यावेत अस मत नागरिक करत आहेत.
निवेदन देते वेळी युवासेना उपतालुका प्रमुख आबु मेस्त्री,तात्या निकम,अमित इस्वालकर, तेजस बोभाटे उपस्थित होते.