कोव्हिडची गंभीर परिस्थीती असताना जिल्हा आरोग्य अधीकारी गेले सहा महिने पगारावीना!

कोव्हिडची गंभीर परिस्थीती असताना जिल्हा आरोग्य अधीकारी गेले सहा महिने पगारावीना!

*कोकण Express*

*कोव्हिडची गंभीर परिस्थीती असताना जिल्हा आरोग्य अधीकारी गेले सहा महिने पगारावीना!*

*त्या’अ‍ारोग्य कर्मचार्‍यांची पदे पुर्नजीवीत करा! जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत*

*सिंधुनगरी*

राज्य सरकारचे मंत्री वसुलीच्या कामात गुंतले आहेत, मात्रकोव्हिडची तिसरी लाट असतानाही कोव्हीड सेटर बंद केली. कंत्राटी १९२आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवा समाप्त केल्या. त्यानंतर २० आरोग्य सेविकांची पदे रद्द केली. याबाबत सदस्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. कोरोनाची तीसरी लाट येतेय हे सरकारच जाहीर करित आहे मात्र आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवा समाप्त करीत आहे. याबाबत सरकार गंभीर नाही. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा गेले सहा महिने पगार दिला नाही ही त्या पेक्षा गंभीर आहे. याबाबतचा संताप सर्वच सदस्यांनी स्थायी समिती सभागृहात व्यक्त केला. तीसरी लाट संपून जाईपर्यंत रद्द झालेली ककंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे पुनर्जीवित करा कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांची पदे शासनाने पुनरुज्जीवीत करावीत असा ठरावही या सभागृहाने घेतला!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समीतीची सभा जि. प. अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सापन्न झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी संजय कापडनीस, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती शर्वानी गावकर, डाँ अनिषा दळवी, अंकुष जाधव, महेंद्र चव्हाण तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र पराडकर उपस्थीत होते. गटनेते रणजीत देसाई, संतोष साटवीलकर, अमरसेन सावंत, दादा कुबल, रेश्मा सावंत, रविंद्र ऊर्फ बाळा जठार, आदी सदस्य उपस्थीत होते.

जिल्हातील उभादांडा, आडेली, खारेपाटण व वडाचा पाट या चारही ग्राम पंचायतींचे विषय स्थायी समीती सभेत गाजले. ग्राम पंचायतीचा कारभार, होणार्‍या ग्राम सभा,मासीक सभा, सचीव म्हणून ग्रामसेवक व ग्राम विकास यांची अधिकारी यांची जबाबदारी, शासन निर्णय या वर चर्चा होत चांगलीच गाजली. उभादांडा ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी यांचा मनमानी कारभार व जि.प मालकीच्या जमिनितील तोडलेली झाडे या बाबतचा विषय आजही गाजला. वेगुर्ला तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे ईतिवृत्तात मोकळी जागा सोडल्या बाबतचा विषय आणी या ग्राम विकास अधिकार्‍यांची जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी याबाबत सर्वच सदस्यानी या विरोधात तोंड उघडले. खारेपाटण ग्राम पंचायतीने मागासवर्गीयांची मागणी असतानाही सार्वजीक लाईट दिवा बत्तीसाठी खर्च केल्याने हा खर्चही वादात सापडला आहे. वडाचापाट ग्राम सचिवालयाचे काम व त्या बाबातच्या मान्यता ग्रामसभा या कायदेशीर की बेकायदेशीर या विषयी या चारही ग्राम पंचायतीच्या विषयात जोरदार चर्चा झाली. अखेर खारेपाटण, उभादांडा, व आडेली या वडाचा पाट ग्राम पंचायतीचा विषय येत्या सोमवारी जि.प. अध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार जि. प. अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. ग्रामसेवकांनी चूकिचे काम केले असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा सुचनाही सदस्यांनी केल्या.

लाडपागे भरतीप्रकरणी चुकीच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्याला विरोधच राहील अशी भूमिका सदस्य अमरसेन सावंत यांनी विरोध दर्शविला तर ग्रामविकास मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपाबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत सभापती अंकुश जाधव यांनी याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!