*कोकण Express*
*युवा पुरोहित स्वानंद उर्फ़ अक्षय करंबेळकर यांचे निधन…!*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी युवा पुरोहित स्वानंद उर्फ अक्षय दुर्गानंद करंबेळकर (25) यांचे आज गुरुवारी सकाळी 5.30 वा.अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस अक्षय याला प्रकृती अस्वस्था मुळे सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर गेले 10 दिवस त्याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले.हसत मुख असलेल्या या युवा पुरीहिताच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.कणकवली चे ग्राम पुरोहित दुर्गानंद करंबेळकर यांचा तो मुलगा होय. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी, काका, काकी असा मोठा परिवार आहे.