*कोकण Express*
*माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पालकमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी १९ ऑक्टोंबर २०२० च्या पत्रान्वये विधानसभेच्या विविध समित्यांवर विधानसभा सदस्यांची नाम नियुक्ती केली आहे.
तशा प्रकारचे आदेश राजेंद्र भागवत सचिव महाराष्ट् विधानसभा यांनी दिनांक १९ ऑक्टोंबर २०२० च्या पत्रान्वये जाहीर केले आहे. सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी शासनाच्या विशेषाधिकार समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.
सदर समितीवर महाराष्ट्रातील चौदा विधानसभा सदस्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे .तसेच ज्यांची विधानसभेच्या नियम समिती विधानसभा नियम २२४ नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या समिती प्रमुख समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या विशेषाधिकार समिती समिती प्रमुख तसेच विधानसभेच्या विशेष समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल दीपक केसरकर यांचे जिल्ह्यातून सर्वस्तरातून तसेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी व शिवसैनिक मधून अभिनंदन केले जात आहे.