*कोकण Express*
*तरंदळे- माईण एसटी बसफेऱ्या सुरु करा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तरंदळे माईण एसटी बसफेऱ्या सुरु करण्याची मागणी माईन सरपंच श्रीम.प्रज्ञा मेस्त्री आणि शिवसेनेचे बाबु घाडी यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ – कणकवली यांच्याकडे केली आहे गेले वर्षभर कोरोनाच्या संसर्गामुळे सबंध राज्यभर एस.टी.फेऱ्या बंद आहेत.शिवाय दळण – वळणाच्या कोणत्याही सुविधा माईन सारख्या ग्रामीण भागामध्ये नाहीत.तरी कर्मचारी वर्ग , वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी व शासकीय कामांसाठी गैरसोय होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांनी कोरोना प्रतिबंध डोस घेतले असून घेतले असून रुग्णसंख्या प्रमाण कमी आहे . तसेच गणेशोत्सव जवळ आलेला आहे.तरी तात्काळ शासकीय नियमांना अधीन राहून आपल्या विभागामार्फत उपरोक्त मार्गावरील सर्व फेऱ्या सुरु व्हाव्यात ही विनंती आहे . सकाळी 8.20 वाजता व दुपारी 2.30 वाजता फेऱ्या सोडण्यात याव्यात अशी मागणी माईन सरपंच श्रीम.प्रज्ञा मेस्त्री आणि शिवसेनेचे बाबु घाडी यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.