*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील विविध विकास कामांसदर्भात खासदार राऊत यांना दिले निवेदन*
*वैभववाडी तालुका विकास मंचच्या आरती संग्रहाचे देखील केले प्रकाशन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना वैभववाडी तालुक्यातील खड्डेमय रस्ते, रेल्वेची समस्या, मुंबई गोवा महामार्ग समस्या, प्राथमिक दवाखान्यातील औषधांची समस्या अशा अनेक समस्यांबाबत वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेतर्फे आज निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी वैभववाडी तालुका विकास मंचतर्फे गणेशोत्सव निमित्ताने बनविण्यात आलेल्या सुबक आणि आकर्षक आरती संग्रहाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी भांडुपचे आमदार रमेश कोरगावकर, माजी आमदार सुभाष बने, नगरसेवक उमेश सुभाष माने, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने, वैभववाडी तालुका विकास मंचचे अध्यक्ष सुरेश भिवाजी पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल तळेकर, सचिव विठ्ठल मासये, कार्याध्यक्ष कृष्ण सोनार, खजिनदार चंद्रकांत रासम आणि सल्लागार सत्यवान पाटील, कार्यकारिणी सदस्य योगेश आंब्रस्कर आणि विनायक कोर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.