*कोकण Express*
*सहाय्यक आयुक्तांच्या हल्ल्याचा कणकवलीत निषेध…!*
*कणकवली न.पं.च्या प्रवेशद्वारावर अधिकारी, कर्मचार्यांनी केली निदर्शने!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ कणकवली नगरपंचातीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी निदर्शने केली.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत तावडे, वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे, लेखापाल प्रीया सोनसुरकर, लिपिक सतीश कांबळे, मनोज धुमाळे, इंजिनिअर सचिन नेरकर, अमोल भोगले, विभव करंदीकर, ध्वजा उचले,विनोद सावंत,कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्यार्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान कसारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे बोट कापले गेली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ कणकवली नगरपंचातीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी निदर्शने केली. हा हल्ला करणार्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केले.