पडेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश सजावट स्पर्धेचेेआयोजन

पडेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश सजावट स्पर्धेचेेआयोजन

*कोकण Express*

*पडेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश सजावट स्पर्धेचेेआयोजन* 

*ग्रामपंचायत सदस्य अमित काशिनाथ घाडी, मनलाॅविसे तालुका अध्यक्ष*

*देवगड ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड  यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल गावामध्ये या वर्षी प्रथमच पडेल गावातील सर्व हवशी कलाकारांसाठी पडेल गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त गणेश सजावट स्पर्धा ‘ सुंदर बाप्पा कोणाचा’ स्पर्धा आयोजित केली आहे तरी पडेल गावातील इच्छुक गणेश भक्तांनी आपल्या नावाचा नोंदणी अर्ज भरून आयोजकांकडे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा….
*अर्ज स्विकारण्याची तारीख…
*०१ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर पर्यंत राहील*
*स्पर्धेमध्ये प्रवेश पुर्णपणे निःशुल्क राहील*

*बक्षिसांचे स्वरूप पुढीप्रमाणे असेल…..*
प्रथम क्रमांक रोख रुपये २५०१/- आणि आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक रोख रुपये १५०१/- आणि आकर्षक चषक
तृतीय क्रमांक रोख रुपये १००१/- आणि आकर्षक चषक
*स्पर्धेचे नियम व अटी* – १) स्पर्धा पडेल गाव मर्यादित राहील याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.
२) स्पर्धेचा कालावधी दिनांक १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत राहील.
३) सजावट पूर्णपणे इकोफ्रेंडली राहील.
४) सजावटी मध्ये धर्माकोल चा वापर नसावा. इतर साहित्याचा वापर करू शकता.
५) स्पर्धेच्या कालावधीमध्ये आयोजक स्वतः घरी भेट देऊन सजावटीचे निरीक्षण करतील.
६) स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर स्पर्धकांच्या घरी भेट देऊन बक्षीसाचे वितरण करण्यात येईल.

*संपर्क क्रमांक…*
बाबू घाडी
९८२३८६९३५५
सुदीप वारीक
७०६६३५३७२०
(स्पर्धेचे काही नियम आयोजकांकडे राखून ठेवण्यात येतील.)
*आयोजक -महाराष्ट्र नवनिर्माण सेना , शाखा- पडेल*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!