*कोकण Express*
*वागदे कसवण रस्त्याची तातडीने डागडुजी पूर्ण*
*राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांचा पाठपुरावा*
*एसटी वाहतूकही सुरू होणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जुलै महिन्यात अतिवृष्टिमुळे तालुक्यातील वागदे कसवण तळवडे रस्त्याच्या मधोमध चार फुट खोल एव्हढा भाग खचला व रस्ता वाहतूकिला बंद झाला. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागने तात्पुरत्या स्वरुपाचा रस्ता तयार केला. त्यामुळे छोट्या वाहनांना वाहतुकीला मोकळा झाला परंतु एसटी वाहतूक बंद असल्यामुळे त्या पंचक्रोशीतील लोकांना येण्याजान्या साठी खुप त्रास सहन करावा लागत होता. राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांच याकडे लक्ष वेधल्यानंत्तर तातडीने या रस्त्याची डागडुजी पूर्ण करण्यात आली आहे.
त्यामुळे गणेश चतुर्थी सणापूर्वी या मार्गावरील एसटी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर विनायक जोशी व जूनियर इंजिनियर राहुल पवार यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी भूसंख्लन झालेल्या रस्त्याची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांना तातडीने रस्ता एसटी वाहतूकीला रस्ता मोकळा झाला पाहिजे त्यासाठी लागणारी सर्व मदत आपण करू असे अबिद नाईक यांनी सांगितले होते. मागील दोन वर्षापासून रस्ता खचन्याचा प्रकार चालू असून त्यावर बांधकाम विभागने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याला भराव टाकून रस्ता एसटी व इतर वाहतुकीसाठी मोकळा केला आहे याबद्दल श्री नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.