*कोकण Express*
*पालकमंत्र्यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*
*स्थानिक नागरिकांशी विविध समस्यांवर चर्चा*
*देवगड ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत देवगड दौऱ्यावर आले असता कुणकेश्वर, कातवण, कातवणेश्वर, मिठमुंबरी, तांबळडेग, हिंदळे, मोर्वे, अन्य भागातील भाजप व अन्य पक्षाचे सुमारे २५० हून अधिक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, संदेश पारकर, सतीश मोतीलिंग, गीतेश कडू, विकास कुडाळकर, निर्मला सावंत पालव, जि. प. सदस्या वर्षा पवार, अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांच्या समस्याही पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन निवेदने स्वीकारली तसेच संबंधित विभागांशी संपर्क साधून तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. या चर्चेत सी-आरझेड, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याबाबतही चर्चा करण्यात आली.
या सोहळ्याच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी सतीश मोतीलिंग, शिल्पा मोतीलिंग व अन्य प्रमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्याच्या निमित्ताने नवनियुक्त शिवसेना पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.