*कोकण Express*
*सावडाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम*
*कोरोना लस धारकांना प्रमाणपत्र वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना च्या महामारीत संपूर्ण देशांत कोविड-19 चे लसीकरण चालू आहे . देश कोरोना मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद मोदी संपूर्ण देशात लसीकरण राबवत आहेत ,आणि प्रत्येक गाव कोरोना मुक्त व्हावा या साठी गावा-गावातील सरपंच-उपसरपंच आपल्या गावागावात लसीकरण मोहीम राबवत आहेत.
दिनांक २७-०८-२०२१ रोजी सावडाव गावात लसीकरण मोहीम पार पडली , त्या लसीकरण मोहीम पार पडत असताना सावडाव गावाचा अनोखा उपक्रम आपल्याला पाहायला मिळाला. आपण कोरोना लस घेतल्या नंतर आपल्याला ऐक प्रमाणपत्र मिळत. सध्या सर्व युवापिढी कडे अँड्रॉइड मोबाईल असल्याने कोरोना प्रमाणपत्र सहज आपल्या मोबाईल मध्ये घेता येत. परंतु या मध्ये गैरसोय होते ती म्हणजे जेष्ठनागरिकांची आणि अशिक्षित लोकांची . त्या साठीच सावडव ग्रामपंचायतीने लस घेतलेल्यांना लगेच लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र वाटप केले. लस घेतलेलं प्रमाणपत्र पुढे प्रवासासाठी आणि इतर सरकारी कामांसाठी आवश्यक असल्या कारणाने सावडाव गावाने ही अनोखी मोहीम राबवली आहे. आम्ही गावात लसीकरण मोहीम 2 दिवसातून राबवत असतो तरी सावडाव गावातील नागरिकांनी अजून पर्यंत ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लवकरच लस घ्यावी अस आव्हाहन नागरिकांना सरपंच मा. अजय कदम यांनी केलं आहे.
या वेळी सावडाव सरपंच अजय कदम उपसरपंच दत्ताराम काटे,लिपिक अक्षय वारंग तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.