*कोकण Express*
*डॉ.पाटकर च्या मुलाशी तुमचा काय संबंध ?*
*संजय राऊतांवर नितेश राणेंचा प्रहार*
*नितेश राणेंचा खळबळजनक सवाल*
*सिंधुदुर्ग ः संंजना हळदिवे*
शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून केंद्रीयमंत्री राणेंच्या निलेश आणि नितेश या दोन्ही पुत्रांवर संजय राऊत यांनी आसूड ओढलेत. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत डॉ.पाटकर च्या मुलाशी तुमचा संबंध काय ? तिचा बाप कोण ? असा खळबळजनक सवाल करत संजय राऊत यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सामनामधून राणे कुटुंबियांवर वैयक्तिय पातळीवर टीकेची झोड शिवसेनेने उठवली असताना त्याला राणेपुत्र आमदार नितेश यांनी राणे स्टाईल ने ट्विटद्वारे उत्तर देतानाच अनेक गुलदस्त्यातील प्रश्नांची उत्तरे देण्यास संजय राऊत यांना भाग पाडले आहे.