*कोकण Express*
*अजित पवार अज्ञानी आहेत ; त्यांनी स्वत:च्या खात्याकडे लक्ष द्यावा..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:च्या खात्याचं पाहावं असा प्रहार त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याला फारसा निधी नाही अशी टीका नुकतीच श्री.पवार यांनी केली होती.
श्री.राणे म्हणाले, अजित पवार यांनी आधी आपल्या खात्याकडे पहावं. मी अजून त्यांच्याकडे वळलोच नाहीय. एका रात्रीच आपल्यावरचे आरोप आणि केसेस कश्या काढायच्या हे शिकायचे तर अजित पवार यांच्याकडून. माझ्या उद्योग खात्याला डायरेक्ट अर्थ खात्याकडून निधी मिळतो त्यामुळे कुणी निधीची चिंता करू नये. आम्ही यापूर्वी साडेचार लक्ष कोटी निधी दिला होता आणि त्यातील तीन लाख कोटी निधी खर्च ही झाला आहे.