*कोकण Express*
*केअर अँड पल्मोनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्राम काळाची गरज-डाॅ.प्रशांत कोलते*
कोरोना पश्चात रुग्णांसाठी फुप्फुस पुनर्वसन कार्यक्रम
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना संसर्ग हा मुख्यत्वे फुफ्फुसांना होणारा न्युमोनिया या स्वरूपात दिसून आलेला आहे .यामध्ये फुप्फुसाची हानी होते व आजारपणा नंतरही रुग्णांना दम लागणे, खोकला असणे यासारखी लक्षणे काही महिन्यापर्यंत दिसून येतात.
गेल्या दोन महिन्यात संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड सेंटर , कणकवली मध्ये जवळपास ८५ रुग्णांनी यशस्वी ट्रीटमेंट घेतली आहे .
या साठी डाॅ.विद्याधर तायशेटे यांना डाॅ.प्रशांत कोलते व डाॅ.निलेश कोदे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डाॅ.प्रफुल्ल आंबेरकर , डाॅ.मुक्तानंद गंवडळकर , डाॅ.चौगुले व डाॅ.धनश्री तायशेटे सावंत यांचेही सहकार्य लाभले.
काळाची गरज ओळखुन याचेच पुढील पाऊल म्हणून , फुप्फुसांची क्षमता पूर्ववत करण्यासाठी “पल्मोनरी रिहॅबिलिटेशन प्रोग्राम” ची नितांत गरज जाणवली आणि म्हणूनच कोलते हॉस्पिटल व चेस्ट क्लिनिक , कसाल आणि संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने अशा प्रकारचा कार्यक्रम कोव्हिड पश्चात रुग्णांसाठी मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी कोलते हॉस्पिटल ,कसाल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी फुप्फुस विकार तज्ञ डॉ.प्रशांत कोलते यांनी कोरोना आजाराबद्दल आणि त्यानंतर फुफ्फुसां ची काळजी कशाप्रकारे घ्यावी , कोणती औषधे घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले .
फिजिओथेरपिस्ट डॉ.उन्मेष पटवारी यांनी फुफ्फुसाच्या व्यायामाबद्दल प्रात्यक्षिके करून घेतली .
डॉ.दर्शना कोलते यांनी आहाराबद्दल मार्गदर्शन केले तर डॉ.नीलेश कोदे यांनी मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ.विद्याधर तायशेटे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचा कोव्हिड पश्चात रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा एकूण तीस जणांनी लाभ घेतला.
अशा प्रकारचा पुढील कार्यक्रम हा ११ नोव्हेंबर २०२० रोजी कोलते हॉस्पिटल व चेस्ट क्लिनिक कसाल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२३२५००२६ या क्रमांकावर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यापासून एक महिन्या पेक्षा अधिक कालावधी होऊन गेलेले रुग्ण ज्यांना अजूनही दमा लागणे, खोकला येणे, ऑक्सिजन प्रमाण कमी राहणे ही लक्षणे जाणवतात अशा व्यक्ती या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन डाॅ.प्रशांत कोलते यांनी केले आहे.