*कोकण Express*
*स्व.अप्पासाहेब पटवर्धन याच्या गोपुरी आश्रमाला केंद्रीय मंत्री राणे यांची भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकणचे गांधी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात जाऊन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दर्शन घेतले.स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला.जन आशीर्वाद यात्रेच्या सातव्या दिवसाची सुरुवात कणकवली गोपुरी आश्रम येथून सुरू झाली. या भेटीत गोपुरीत चालणारे काम कार्यपद्धती समजून घेतली व आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर,आमदार नितेश राणे सोबत होते. वागदे येथे यात्रेचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य सौ.सायली सावंत, पंचयत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री.