*कोकण Express*
*शिवसेना घडवण्यासाठी माझाही वाटा आहे….*
*अतिरेक्यांपासून जीवाला धोका होता तेव्हा स्व.बाळासाहेबांना रात्रंदिवस जागून संरक्षण दिले; केंद्रीय मंत्री राणे*
शिवसेना घडवण्यासाठी माझा वाटा आहे.शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अतिरेक्यांपासून जीवाला धोका होता. शरद पवार यांनी अज्ञातस्थळी जाण्यास सांगितले होते. आतंकवादी बाळासाहेबांच्या जीवावर उठले होते. बाळासाहेबांनी मला बोलावून संरक्षण देण्याची सूचना केली होती. मी माझ्या सहकाऱ्यांची टीम घेऊन बाळासाहेबांना रात्रंदिवस जागून संरक्षण दिले.साहेबांच्या सुरक्षेसाठी गाडीतच झोपत होतो.मिळेल ते खत होतो.कधी माँसाहेब घरून डबा पाठवत असत.त्यानंतर मातोश्रीबाहेर सुद्धा रात्रो-रात्र जागून आम्ही पहारा दिला आहे.मच्छरीचा त्रास सहन केला आहे. या सर्व घटनाक्रमाची आठवण करून देत, आता बस करा असा इशाराही राणे यांनी शिवसेनेला दिला.