*कोकण Express*
*हरकुळ खुर्दचे दिलीप घाडीसह ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव पुन्हा स्वगृही…!!*
*काल भाजपात तर आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश;पैसे दिल्याने भाजपात प्रवेश केल्याची कबुली..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हरकुळ खुर्द मधील शिवसेनेचे दिलीप घाडी व
ग्रापंचायत सदस्य संतोष जाधव यांनी काल भाजपात प्रवेश केला होता.त्यांनी गुरुवारी पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे, कालचा प्रवेश पैसे दिल्याने केल्याचा कबुली यावेळी संतोष जाधव यांनी दिली.
कलमठ येथील जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव,दिलीप घाडी यांना सतीश सावंत यांनी भगवी शाल व हातात शिवबंधन बांधत स्वागत केले.
यावेळी संजय रावले,आनंद ठाकूर,महेंद्र डिचोवळकर,अजय सावंत,दामु सावंत,उमेश घाडी आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव यांनी आपल्याला पाच हजार दिले होते. त्यामुळे मी भाजपात प्रवेश केला. मी शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक असून यापुढे शिवसेनेतच काम करणार असल्याचे सांगितले. तसेच दिलीप घाडी यांनी आपण शिवसेनेशी प्रामाणिक आहोत. आमचे स्थानिक पातळीवर गैरसमज होते. मात्र ते गैरसमज आमचे नेते सतीश सावंत यांनी दूर केले आहेत. त्यामुळे मी आता शिवसैनिक म्हणून काम करणार आहे.कालचा प्रवेश अचानक केल्याने आमचा गोधळ झाल्याचे त्यांनी सांगितले.