केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांचे नांदगावात जल्लोषात स्वागत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांचे नांदगावात जल्लोषात स्वागत.

*कोकण  Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांचे नांदगावात जल्लोषात स्वागत.*

*ढोल ताशांच्या आवाजाने नांदगाव दुमदुमले*

*नांदगाव ः प्रतिनिधी*

केंद्रीय मंत्री मा. श्री नारायण राणे साहेब यांचं आज सकाळी ११ वाजता  नांदगाव तिठ्यावर आगमन झाले . ढोल ताशांच्या   गजराने राणे साहेबांच नांदगाव मध्ये स्वागत करण्यात आलं. नांदगाव ग्रामपंचायत ,तोंडवली ग्रामपंचायत, असलदे ग्रामपंचायत, नांदगाव रिक्षा संघटना,नांदगाव व्यापारी संघटना,कणकवली पत्रकार संघटना,यांनी राणे साहेबांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केली,त्याच प्रमाणे कणकवली पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर,पंढरी वांगणकर,योगेश सदडेकर यांनी राणे साहेबांचा वैयक्तिक सत्कार केला.
यावेळी भाजपा उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, माजी आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, राजन तेली.भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे, आमदार नितेश राणे, पंढरी वांगणकर,योगेश सदडेकर, भाई मोरजकर, नांदगाव सरपंच अफ्रॉजा नावलेकर, तोंडवली सरपंच गुरव म्याडम इत्यादी उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!