लाख बंधने घाला…देवगडात जनआशीर्वाद यात्रा होणारच

लाख बंधने घाला…देवगडात जनआशीर्वाद यात्रा होणारच

*कोकण  Express*

*लाख बंधने घाला…देवगडात जनआशीर्वाद यात्रा होणारच*

*600 मोटरसायकल च्या ताफ्यात अतिविराट मोटरसायकल रॅलीने होणार जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत*

*गुन्हे दाखल केलात तरी बेहत्तर..*

*भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांचा इशारा*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

आमच्यावर लाख बंधने घातलात..गुन्हे दाखल केलात तरी बेहत्तर..आम्ही आमच्या लाडक्या राणे साहेबांच्या जनआशीर्वाद यात्रेचे देवगडात विराट मोटरसायकल रॅली ने न भूतो असे स्वागत करणारच. मनाई आदेशभंग चे गुन्हे दाखल केलात तरी बेहत्तर…केंद्रीय उद्योगमंत्री राणेंची जनआशीर्वाद यात्रा देवगडात होणारच असा इशारा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी दिला आहे. देवगड तालुक्यात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी भाजपा युवा मोर्चा देवगड तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली अतिविराट अशा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 600 हुन अधिक मोटरसायकल चा ताफा केंद्रीय मंत्री राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज आहे. नांदगाव तिठ्यापासून केंद्रीयमंत्री राणेंच्या देवगड तालुक्यातील जनआशीर्वाद यात्रेला 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. नांदगाव तिठ्यापासूनच 600 मोटरसायकल च्या ताफ्याची अतिविराट मोटरसायकल रॅली राणेंच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. तिथून पुढे देवगड तालुक्यातील जनआशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यात ही अतिविराट मोटरसायकल रॅली सहभागी असणार आहे. जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. 5 पेक्ष्या जास्त माणसे एकत्र आल्यास मनाई आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. असे असले तरी आम्ही आमच्या लाडक्या नेत्याच्या स्वागताला 600 हुन अधिक मोटरसायकल च्या ताफ्याने जाणारच आहोत. भले आमच्यावर गुन्हे दाखल केलात तरी बेहत्तर असा इशारा भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!