*कोकण Express*
*खारेपाटण सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर ना.राणेंचे जल्लोशी स्वागत*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर ना्.नारायण राणे यांचे मोठ्या संख्येने उपस्थित महिलां ,तरुण व जेष्ठ नागरिकांनी स्वागत केले.या स्वागत समारंभात अनेकांना ना. नारायण राणे यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या . तोच दिमाख तीच उत्स्फूर्तपणा आज दिसत होता .विविध सामाजिक संघटना पदाधिकारी ,आदिनी त्यांचे स्वागत केले . महिलांनी औषण केले . ना. नारायण राणे म्हणाले , कोकणातील जनतेने मला प्रेम दिले आहे .मी केंद्रात मंत्री झाल्याने कोकणच्या विकास करत असताना माझ्या विभागात मार्फत योजनांतून अनेक उद्योजक निर्माण झाले तर मला त्याचा आनंद आणि समाधान मिळेल. यावेळी अनेक योजनांची माहिती ना. राणे यांनी दिली .
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा खारेपाटणमध्ये दाखल झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे हजारो कार्यकर्ते खारेपाटणच्या महामार्गावर जमा झाले आहेत. राणेंसोबत माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, यात्रा संयोजक प्रमोद जठार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच ढोल ताशांच्या गजरात राणेंचे खारेपाटणनगरीत स्वागत झाले.